वाघाच्या हमल्यात रामपुर येथील कैलास धारने जखमी
नेरी-जांभुळघाट परीसरातील हि एकाच महिन्यातील चौथी घटना
वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरीकांची मागणी
तालूका - प्रतिनीधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा रामपुर येथील कैलास आनंदराव धारणे यांचेवर तळोधी रेंज कक्ष क्र.४२० मध्ये स्व:ताचे गुरे चारीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हमला करून जखमी केले.जवळच नागरीक असल्याने आरडा-ओरड केल्याने वाघ हा पळून गेला व थोडक्यात गुराखीचा जीव वाचला. हि घटना अत्यंत भयावह होती कि बचाव कार्यासाठी धावून जाणारे नागरिक सुद्धा घाबरून गेले.हि घटना आज दिनांक. ०९/१०/२०२५ ला दुपारी ०१:०० वाजता च्या सुमारास घडली असता हल्ला केलेल्या इसमास प्रथमोपचारासाठी चिमुर येथील उपजिल्हा रूग्णलयात नेण्यात आले.नेरी-जांभुळघाट जंगल परीसरातील हि एका महिन्यातील चौथी घटना असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच नागरिकांची वन विभागावर तिव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे. वन विभागा कडून लवकरात-लवकर वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा. नाही तर या परीसरात वाघा मुळे नागरीकांचे जीव गेल्याशिवाय राहणार नाही.अश्या प्रकारची नागरीका कडून तिव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!