सावरी (बीड) येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामात भ्रष्टाचार - प्रहार सेवक विनोद उमरे यांचा आरोप

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - सावरी बिडकर येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यवहाराकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी लक्ष देवून कारवाई करावी, अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे. सावरी बिडकर येथे पाइपलाइन तीन फूट टाकायची होती. मात्र, कंत्राटदाराने केवळ एक ते दीड फूट टाकण्यात आली आहे. या संबंधात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे अनेकदा निवेदन सादर करण्यात आले. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचे शंकाही विनोद उमरे यांनी व्यक्त केली आहे. जलजीवन मिशनच्या कामावर लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही योजना निकामी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.२०२२पासून कामाची सुरुवात करण्यात आली होती.तरी  जिवन योजनेचे काम काही पूर्ण झाले नाही.सदर जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली होती. सदर निवेदनाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी धिकारी  जलजीवन मिशन योजनेच्या कामाची चौकशी करणार काय, याकडे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!