उलगुलान
वारा आला जंगल हलले सळसळली पाने एक तुफान उठले उलगुलान! उलगुलान!
अन्यायाच्या दूताला पर्लकोटा पामुल गौतमीचे पाणी दाखवा इंद्रावतीचे खोल खोल डोह दाखवा अन बुडवून टाका रे बुडवून टाका
वारा आला जंगल हलले सळसळली पाने…
दमन असू द्या कोणाचेही गाडा त्याला पुरून टाका दंडकारण्याच्या लाल भूमीत
वारा आला जंगल हलले सळसळली पाने…
हाक ऐका बिरसाची अन बाबुराव शेडमाकेची घ्या कलम हाती अन करा एल्गार दाखवून या दुनियेला आदिवासीची शक्ती
वारा आला जंगल हलले सळसळली पाने…
करीत जारे हाकारा ओडीशातून मध्यप्रांतामधून जोडा त्याला छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणा अन आंध्र
वारा आला जंगल हलले सळसळली पाने…
धरा धरा रे हात धरा बांधून मुठी लगाव ठोसा अंत करा अन्यायाचा धरून हाती मशाल नव स्वातंत्र्याची नवी पहाट उगवेल आता.
वारा आला वादळ आले सळसळली पाने उडून लावू शोषकांना आदिवासींच्या स्वातंत्र्या साठी.
सळसळली पाने…
- प्रभू राजगडकर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!