मुलचा "हा" विद्यार्थी ठरला गोडवाना विद्यापीठाचा आदर्श विद्यार्थी

कर्मवीर महाविद्यालय मूल.जि.चद्रपूर चा संघर्ष गजभिये गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित


गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत विद्यार्थी विकास विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी आदर्श विद्यार्थी पुरस्काराचा मानकरी म्हणून, कर्मवीर महाविद्यालय मूल ,येथील विद्यार्थी संघर्ष गजभिये याची निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. अनिता वाळके व सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी संघर्ष चे अभिनंदन केले आहे. पदवीचे शिक्षण घेत असतांना संघर्ष ने राष्ट्रीय सेवा योजना , सांस्कृतिक विभागा द्वारे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालय व विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.त्यात राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर "आव्हान",राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सव "उत्कर्ष" २०२३-२४ बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव इंद्रधनुष २०२४, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ संशोधन महोत्सव आविष्कार २०२४-२५ लोणेरे‌, जागतिक उद्योजकता शिखर (Global Entrepreneurship Summit), आयआयटी खडकपूर, राज्यस्तरीय "विकसित भारत युथ पार्लमेंट २०२५"मुंबई इत्यादी प्रातिनिधिक स्पर्धांचा समावेश आहे.शिवाय शांत स्वभाव, अभ्यासुवॄती , शिस्तबद्ध वर्तन, भविष्यचे उराशी स्वप्न घेऊन यशाची पायरी चढत असलेला हा संघर्ष आहे.
संघर्षने या यशाचे श्रेय आई -वडील व आपले गुरुजन यांना दिलेले आहे. दि .०६ ऑक्टोबर,२०२५ रोजी विद्यापीठाच्या वतीने या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाने संघर्षचे अभिनंदन करून पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!