टँकरची स्कुटीला धडक एक ठार,एक जखमी
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकरने वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन समोर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर पेट्रोल टॅंकर ने स्कुटीला मागून धडक दिल्याने दुचाकी वरील पाठीमागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी शेगाव येथे घडली.वरोरा येथील कातोरे कुटुंब सकाळी आपल्या स्कुटीने भिवापूर तालुक्यातील सेलोटी या ठिकाणी तेरवीच्या कार्यक्रमाला जात असताना शेगाव पोलीस स्टेशन समोर हा अपघात घडला,कोमल गंगाधर कातोरे वय ३३ वर्षे रा. गांधी वॉर्ड वरोरा असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार गंगाधर बापूराव कातोरे वय ४२ वर्ष,कोमल गंगाधर कातोरे वय ३३ वर्ष व मुलगा रोहन गंगाधर कातोरे हे तिघेही राहणार गांधी वार्ड वरोरा येथून आपल्या MH 34 CP 1649 या दुचाकीने निघाले असता मागून भरधाव येणाऱ्या MH 34 AB 4509 या पेट्रोल टँकरने , दुचाकीला जबर धडक दिल्याने पाठीमागे बसलेल्या कोमल गंगाधर कातोरे या महिलेला डोक्याला जोरदार धडक बसून तिचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा जखमी आहे, घटनेची माहिती शेगाव बु. पोलिसांना मिळतात त्यानी पेट्रोल टँकर चालक परमेश्वर खामदेवे मु. पडोली याला ताब्यात घेऊन मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेंद्रसिहं यादव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुमित कांबळे, मदन येरने,हरीश येरमे,छगण जांभुळे, हेमंत पाटिल करीत आहेत. यावेळी घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी केली होती.हा अपघात टाळता आला असता शेगाव मधून वरोरा शेगाव, चिमुर, उमरेड राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई गेला आहे या रोड लगत सर्विस रोड बारा मीटरचे रुंदीचे नकाशात असून बांधकाम करण्यात आले नसून मोठ्या प्रमाणात रोडवर ठिकठिकाणी दुकानदारांचे अतिक्रमण वाढलेले आहेत,तेथेच समोर वाहने उभे राहत असून रस्त्यावरुन वाहने चालवताना जाणाऱ्या, येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असते नेहमी छोटे मोठे अपघात घडत असतात भविष्यामध्ये हे अपघात वाढत जाणारे असून सर्विस रोड असता तर हा अपघात घडला नसता.
डॉ. शिवनंदन ताजने शेगाव


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!