भद्रावती शहरातील हॉटेल मधून युवकाचे चार लाख उडविले... पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल..


भद्रावती शहरातील हॉटेल मधून युवकाचे चार लाख उडविले...

 पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल..



भद्रावती...जगदीश पेंदाम

येथील हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलेल्या युवकाचे टेबलावरून चार लाख उडवल्याची घटना दिनांक १५ रोज सोमवारला दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात घडली आहे..

आशिष यशवंत काळे वय ३१  राहणार बरांज मोकासा असे रक्कम चोरी गेलेल्या युवकाचे नाव आहे आशिषला बरांज खुल्या कोळसा खाणीच्या प्रकल्पातून काही रक्कम मिळाली होती त्या रकमेतून तो शेती खरेदी करण्यासाठी चार लाखाची रक्कम एच डी एफ सी बँकेतून काढली असुन उर्वरित रक्कम पाच लाख काढण्यासाठी तो स्टेट बँक ऑफ इंडिया येथे आला होता बँकेत विड्राल भरल्यानंतर रक्कम मिळण्यास वेळ असल्याने त्याने त्याच बँकेच्या खाली असलेल्या संतकृपा हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेला व टेबलावर जवळ असलेली रक्कम ठेवून हात धुण्यासाठी गेला असता त्याच वेळात अज्ञात चोरट्यांनी त्याच्या टेबलावरची रोख रक्कम चार लाख लंपास केले यानंतर फिर्यादीने टेबलावर पिशवी बघितली असता त्याला ती दिसली नसल्याने त्याला चोरी झाल्याचे कळले. त्यांनी लगेच भद्रावती पोलीस स्टेशन गाठून या घटनेची तक्रार नोंदविण्यात आली ठाणेदार योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात गुन्हे अन्वेशन विभागाची टीम अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!