नेरी ग्राम काँग्रेस कमिटी च्या वतीने डॉ.सतीशभाऊ वारजूकर यांचा वाढदिवस केला उत्साहात साजरा
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - नेरी ग्राम काँग्रेस कमिटी, महिला ग्राम काँग्रेस कमिटी, युवक ग्राम काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे 74 चिमूर विधानसभा समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी, मा. डॉ. सतीश भाऊ वारजूकर यांचा वाढदिवस श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरी येथे समस्त नेरी जि. प. सर्कल पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माय मंजुळा माता आडकोजी महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आसनावर हार अर्पण करून झाली या प्रसंगी उपस्थित डॉ. नामदेवराव किरसान खासदार, सतीश भाऊ वारजूकर यांना प्रा. राम राऊत सर आणि घनश्याम जी चापले सर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कार्य कर्त्यांनी आपला उमेदवार जरी पडला असेल तरी जनतेनी आपल्याला नाकारलं नाही ,आपल्या पक्ष्यातून मोठे होऊन जरी पैशाच्या मागे धावणारे गेले असेल तरी इंदिरा गांधींवर प्रेम करणारी पक्षावर निष्टा ठेवणारे ऐक निष्ट कार्यकर्ते आज इथे आहेत ,जरी आपलं सरकार नसेल तरी आम्ही उमेद अजून प्रयत्न सोडली नाही लाचार बनू नका निष्टावंत बना असे मार्गदर्शन या प्रसंगी मान्यवरांनी केले त्या नंतर समस्त कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील भावी जीवनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी नेरी येथील प्रा . राम राऊत सर सेवादल सरचिटणीस , गजानन बुटके, सरचिटणीस जिल्हा काँग्रेस , किशोर जी शिंगरे सेवादल अध्यक्ष अविनाश जी अगडे चिमूर शहर अध्यक्ष, विवेकजी कापसे,स्वप्नील मालके, घनश्यामजी चापले, राजू दादाराव पिसे, विलास हरिभाऊ पिसे, नेरी नवतळा जि. प. सर्कल प्रमुख, गुलाबराव पिसे ,जगदीश पिसे, अशोक तिडके, किसनाजी लाभे ,कोंडूजी दडमल, किशोर शंभरकर, पुरुषोत्तम इंदोरकर ,रवींद्र उरकुडे अंकुश ननावरे, विजय कडूकार रामदासजी साहारे सौ लता पिसे माजी सभापती, सौ.प्रणया गडमवार ,सविता ताई चौधरी, इतर महिला, नागेश चटे ,प्रशांत डवले,भोजराज कांमडी, संजय पिसे, सुधाकर भरडे ,अयान पठाण,अयफाज पठाण, राहुल पिसे नेरी शहर युवक अध्यक्ष श्रीकांत गेडाम,आणि इतर बहू संख्य पदाधिकाराच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!