मूल शहरालगत क्रीडांगण परिसरात दोन बिबट्यांची एन्ट्री, फिरायला येणारे नागरिक धास्तावले"
मूल शहराला लागून असलेल्या कर्मवीर क्रीडांगण शेजारील झाडावर दोन बिबट्या बसलेले दिसून आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
सदर क्रीडांगणावर दररोज गावकरी, युवक व महिला मोठ्या संख्येने फिरायला येतात. याशिवाय या परिसरात महाविद्यालय देखील असल्याने अनेक विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे या सर्वांना प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!