तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक. १५ सप्टेंबर २०२५
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा, आणि तालुका क्रीडा संकुल समिती, पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना गांधी विद्यालय, कोंढा येथे उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.या स्पर्धेमध्ये सांघिक खेळ खो-खो आणि कबड्डी यांचा समावेश आहे, त्याचबरोबर वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाकौशल्ये आणि खिलाडूवृत्तीचा विकास होण्यास मदत मिळत आहे. संपूर्ण स्पर्धा आनंददायी आणि शांततेच्या वातावरणात पार पडत आहेत.या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधणे हा आहे, असे प्रतिपादन तालुका संयोजक तथा प्राचार्य डी. बी. पवार यांनी केले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने भाग घेण्याचे आवाहन केले आहे.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक डी. वाय. नेवारे, अशोक गिरी, राजेश येलशेट्टीवार, प्रदीप घाडगे, विनोद दिघोरे, अनिल कावळे आणि तुषार रंगारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!