चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ वाढल्याने पोलीस प्रशासन सतर्क

जिल्ह्यात ठिक - ठिकाणी नाकाबंदी मोहीम सुरु 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. अशातच दिनांक. १५ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील पांढरकवडा याठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र च्या ATM मशीन मधून लाखो रुपये चोरी केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री च्या सुमारास घडली हि घटना सकाळी उघळकीस आली असून घुग्घुस शहरात सध्या भीतीचे वातावरण पसरले असल्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर नाका बंदी करून कार, दुचाकी व जड वाहने यांची झडती घेतली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!