अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा व धनगर, गोवारी,लबान समाजाचा समावेश करू नका
जागतिक गोंड सगा मांदी वरोरा/भद्रावती तालुका मार्फत निवेदनातून केली मागणी
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - राज्यातील बंजारा व धनगर, गोवारी,लभान समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी जागतिक गोंड सगा मांदी वरोरा/भद्रावतीच्या शिष्टमंडळाने वरोरा तहसीलदारांमार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. संविधानाच्या कलमानुस्तर आदिवासी आयोगाने निश्चित केलेल्या कसोट्या पूर्ण करणाऱ्या आदिवासी जमातींना अनुसूचित जमाती म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. सदर करलेल्या बंजारा समाजाने कोणत्याही राज्यात पूर्ण केलेल्या नाही यामुळे त्यांना महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर बंजारा समाजासारख्या अनेक जातींनी अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी केली आहे. प्राचीन जीवन पद्धती, भिन्न संस्कृती, दुर्गम निवास, अबोल व लाजाळूपणा,अति मागासलेपणा या पाच कसोटया बंजारा, धनगर, लभान, गौरबंजारा या समाजाने पूर्ण केल्या नाही, यामुळे बंजारा समाजाचा आदिवासी समुदावाशी कोणताही संबंध नाही, समुदायाच्या दवावात खाली आंध्रप्रदेश सरकारने लवाडा किवा बंजारा या जातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. परंतु, याच जमातीला कर्नाटक प्रदेशामध्ये अनुसूचित जातीच्या वाडीमध्ये समाविष्ट केले आहे. उर्वरित राज्यांमध्ये ओबीसीत वा समाजाचा समावेश आहे. महाराष्ट्रात बंजारा समाजाला अनुसूचित जमाती यादीमध्ये समाविष्ट करावे, हा त्यांचा दावा चुकीचा आहे. यामुळे राज्य सरकारने अनुसूचित जमातीत बंजारा व लभान समाजाला समाविष्ट करू नये, अन्यथा आदिवासी समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जागतिक गोंड सगा मांदी वरोरा, भद्रावती यांनी दिला आहे, या शिष्टमंडळता अध्यक्ष जागतिक गोंड सगा मांदी वरोरा सुरेश मडावी, सामाजिक कार्यकर्ता वरोरा /भद्रावती भास्कर तुमराम , प्रभाकर कुळमेथे, प्रकाश तोडासे, अनिल आत्राम, प्रभाकर आडे, भाविक गेडाम, मनोज तोडासे, नात्थू मंगाम, बळवंत आत्राम, पंडित आत्राम, वनिता परचाके, मंदा मेश्राम, योगिता मेश्राम, विना किंन्नाके, विद्या तोडासे, कोटंनाके ताई, सुनीता मंगाम, अनुबाई येडमे, आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!