पावसामुळे खराब झालेल्या पिकामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी.. लाल्या बेरडा,यलो मोझाक, अतिवृष्टीमुळे शेतपिके संकटात..

पावसामुळे खराब झालेल्या पिकामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी..
 लाल्या बेरडा,यलो मोझाक, अतिवृष्टीमुळे शेतपिके संकटात..

वरोरा...जगदीश पेंदाम

शेतकऱ्यांनी शेती हंगामात महागडी बिजे, औषधी घेऊन शेतामध्ये खरीप हंगामाची लागवड केली एकीकडे खरीप पिकाकडे आस लावून पाहत असताना तीन दिवसा अगोदर पडलेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसाने परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीच पाणी दिसून येते आहे..
 
शुक्रवारला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेगाव परिसरातील मोठ्या प्रमाणात चंदन,ईरई नाल्याचे पाणी वाहुन शेतीमध्ये घुसले त्यातच दोन दिवसापासून पडलेल्या अतिवृष्टी पावसामुळे तुर,पराठी,सोयाबीन पिकांची नुकसान झाले.अगोदरच आलेल्या पिवळा करपा, यँलो, मोझाँक, लाल्या बेरडा रोगामुळे मुळे शेतकरी संकटात सापडला असताना अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांना शेतपिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे..


विविध रोगामुळे झालेल्या नुकसानीच्या तालुका कृषी विभाग यांच्याकडून पंचनामा करण्यात आला असून नुकसान झालेल्या जवळपास 7,400 हेक्टर शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले असून रोग नुकसान पंचनामा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहे, काही दिवसांवर असलेला दिवाळी सण हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असुन एकीकडे सोयाबीन पिके हे नगदी असणारे पिके संकटात सापडून शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे, दुसरीकडे सरकारच्या ऑनलाइन ई पिक पाहणीमध्ये अडचणीत सापडलेला शेतकरी आधीच गोंधळून गेला असून आदीच सोयाबीन ला शेंगा नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला,तसेच अतिवृष्टीमुळे पुन्हा सोयाबीनला फटका बसलेला असल्याने शेतकऱ्यांना जिल्हा कार्यालयाकडून नुकसान भरपाई कधी प्राप्त होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेले आहे..
  
एकीकडे तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या 1700 हेक्टर शेतीपिकांचे अहवाल महसूल विभाग कडून जिल्हा कार्यालय येथे पाठवण्यात आले.
धान पिकावर काही ठिकाणी लाल्या बेरडा, पांढरी माशी मोठ्या दिसून येत असू ही अळी हिरवी पाने खाऊन,गुंडाळून धान पिकाचा झाडाला पांढरे व लाल करत असतात याच्या प्रादुर्भाव शेगाव परिसरात पाहायला मिळत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे..


यासंदर्भात मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधूला असता परिसरात काही ठिकाणी धानावर हिरवे पाणी खाणारी, पाणे गुंडाळणारी अळी असून शेतकऱ्यांनी रोग नियंत्रण औषधीचा वापर करून फवारणी केल्यास अळीवर नियंत्रण मिळवता येते..

मंडळ कृषी अधिकारी काळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!