शिवटेकडी व बौद्धटेकडीवर पाणी व विजेची सोय करून द्यावी – युवाक्रांती संघटनेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन

शिवटेकडी व बौद्धटेकडीवर पाणी व विजेची सोय करून द्यावी – युवाक्रांती संघटनेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन


मूल : मौजा मूल येथील चंद्रपूर मार्गालगत असलेल्या शिवटेकडी व बौद्धटेकडीवर पिण्याचे पाणी आणि विजेची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवक्रांती संघटनेच्या वतीने माजी मंत्री तथा बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक नेहमी दर्शनासाठी येतात. मात्र, विजेची सुविधा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी भाविकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. याशिवाय, गेल्या दोन महिन्यांपासून वीजपुरवठा नसल्यामुळे बिबट्या झाडावर ठाण मांडून बसल्याचे नागरीकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

युवकांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, श्रावण महिन्यातील शिवरात्री, तसेच ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बौद्धटेकडीच्या वर्धापन दिनाला जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेरील जिल्ह्यांतील हजारो भाविक येथे दाखल होतात. मात्र पाण्याची व विजेची सुविधा नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.

या पार्श्वभूमीवर तातडीने शिवटेकडी व बौद्धटेकडीवर पाणी व विजेची व्यवस्था करावी, अशी मागणी युवक्रांती संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

निवेदन देताना प्रणित पाल, निखिल वाढई, अक्षय दुम्मावार, निहाल गेडाम, हर्षवर्धन दुपारे, राज चिमूलवार, कालिदास गुरनुले, तुषार घ्यार, सुमित दुपारे, ओम लाटकर, दिनेश गुरनुले, किशोर चौकुंडे, ईश्वर लोणबले तसेच महिला कार्यकर्त्यांमध्ये शेंडे काकू व खोब्रागडे काकू यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!