वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे वीज ग्राहक हैराण

वारंवार बत्ती गुल,विजबिल मात्र फुल

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
 
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बु,चारगाव बु, परिसरात वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. मागील बऱ्याच दिवसापासून विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे नागरिकाचे जीवन त्रस्त झाले आहेत दिवसातून चार-पाच वेळा तसेच रात्री तीन चार वेळा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने  शासकीय  निमशासकीय कार्यालय, झेरॉक्स सेंटर,आटा चक्क्या घरगुती ग्राहकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

वीज वितरण च्या हलगर्जी पणामुळे सामान्य जनता अक्षरशा हैराण झाली असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे वीज पुरवठ्यातील या अनियमतेमुळे अनेक ठिकाणच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत वारंवार बत्ती गुल, विज बिल मात्र फुल अशाही परिस्थितीत नागरिकाकडून वेळेवर वीज बिल भरण्यासाठी दबाव टाकणारे अधिकारी, वीज पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप परिसरातील स्थानिकांनी केला आहे 
  तालुक्यात शेगाव,चारगाव बु.परिसरात रात्रीच्या परिसर वेळेस वारंवार लाईट बंद होवून कमी होल्टेज राहत असल्यामुळे  घरातील पंखे,लाईट,आदी उपकरणे सुरू तसेच बंद होऊइ वारंवार वीज पुरवठा का ? खंडित होतो या बाबतीत नागरीक हताश होऊन नाराजी पसरली आहे तक्रार करूनही वेळी उपाययोजना होत नाही त्यामुळे संभाव्य असंतोष उफडण्याची शक्यता आहे. सदर समस्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास नागरिकांच्या संताप अधिक वाढू शकतो सामान्य  नागरिक महावितरण कंपनी च्या अनागोंदी व गलथान  कारभाराला वैतागले असून, व्यवस्थापनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शेगाव बु.चारगाव बु. महावितरण कार्यालय अंतर्गत मोठ्या प्रमाणात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लगत अनेक गावे येत असतात रात्रीच्या सुमारास वन्यजीव गावाशेजारी  येत असून मानव वन्यजीव संघर्ष तसेच वन्य प्राण्यांच्या हमल्यात मनुष्य जीव जाणे संभाव्य आहे, त्याचप्रमाणे शेती हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील्ल शेतकरी,नागरिक शेती पिकांचे रक्षणासाठी रात्रीच्या सुमारास शेत शिवारात जात असतात अशाच वारंवार अंधारामध्ये शेतकरी, नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे महावितरण या समस्या कडे लक्ष देणार काय? हे पाहण्यासारखे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!