सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

भद्रावती : - भद्रावती तालुक्यात येत असलेल्या वडाळा येथील शेतकरी सुभाष कुडमेथे यांच्या शेतामध्ये असलेल्या पोएट्री फॉर्ममध्ये मोठा साप असल्याची माहिती वनविभागा मार्फत सर्पमित्राला मिळताच त्या ठिकाणी जाऊन सुरक्षित  अजगर सापाला पकडून जीवदान दिलेले आहे.
सर्पमित्र जगदीश पेंदाम यांना काटेरीझरी क्षेत्र सहाय्यक ननावरे यांच्यामार्फत सुभाष कुलमेथे यांच्या शेतामध्ये मोठा साप असल्याची माहिती फोन द्वारे मिळाली असता सर्पमित्र पेंदाम घटनास्थळी जाऊन भारतीय अजगर सापाला पकडले आहे अजगर सापाने दोन कोंबड्याला आपले खाद्य बनवले असून रात्री रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात कुडमेथे यांच्या पोयल्ट्री फार्म मध्ये अजगर साप आला असून सर्पमित्र कडून सुरक्षित सापाला पकडून ताडोबा जंगलात सोडण्यात आले यावेळी उपस्थित काटेझरी क्षेत्र सहाय्यक ननावरे ,ताडोबा वनरक्षक जुडे,  घोसरी,वनरक्षक वगारे, वडाळा वनरक्षक प्रधाने आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!