लोक विद्यालयातील कु.संगीता ढोके जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित .

लोक विद्यालयातील  कु.संगीता ढोके जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित .
तळोधी : 
                    नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील लोक विद्यालयातील कर्तव्यदक्ष शिक्षिका  कु. संगीता ढोके   यांना चंद्रपूर येथे जिल्हा आदर्श शिक्षिका म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक  संघातर्फे  शिक्षक आमदार सुधाकर आडबले यांचे प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
दि रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी द्वारे संचालीत लोक विद्यालय सावरगाव येथील कर्तव्यदक्ष व  विज्ञान  शिक्षिका  कु. संगीता ढोके  यांना शैक्षणिक विविध क्षेत्राच्या उल्लेखनीय  कार्याची दखल घेऊन  "उत्कृष्ट शिक्षक"  हा सन्मान   विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा   चंद्रपूर   यांच्यावतीने शिक्षक आमदार सुधाकर आडबले  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी  व्हि.यु.  डायगव्हाणे  माजी  शिक्षक आमदार , दिलीप चौधरी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, राजेश पातळे शिक्षणाधिकारी माध्यमिक चंद्रपूर, जगदीश जूनघरी   उपाध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ मुंबई, स्मिताताई आडबले  अध्यक्ष गोविंद_ मैना फाउंडेशन  चंद्रपूर, लक्ष्मणराव ढोबे  सदस्य विदर्भ माध्यमिक संघ, प्रवीण नाकाडे सदस्य विदर्भ माध्यमिक संघ, प्राचार्य  अनिल शिंदे  अध्यक्ष नागपूर विभाग शिक्षण संस्था , प्राचार्य सूर्यकांत खनके सचिव नागपूर विभाग शिक्षण संस्था   इत्यादी मान्यवर  उपस्थित होते . यामुळे संस्थेचे संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच  स्थानिक नागरिकांकडून अभिनंदन होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!