प्राचार्य अशोकराव झाडे यांचा सहदय सत्कार संपन्न.

प्राचार्य अशोकराव झाडे यांचा सहदय सत्कार  संपन्न. 



          शिक्षक दिनाच्या शुभपवॉवर शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चे  प्राचार्य  अशोकराव झाडे  यांचा सत्कार  समारंभ संपन्न झाला. 
        नवभारत विद्यालय व कनिष्ठ   महा. चे शिक्षक, पा़ध्यापक, शिक्षकेत्तर कमॅचारी यांनी या    भावनिक समारंभाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, संस्थापक अध्यक्ष ॲड. वि.तू. नागपूरे  यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दिपप्रज्वलन करण्यात आले.
            आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. शाळेच्या वतीने शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व या निमित्ताने प़ाचायॅ अशोक झाडे यांना गौरविण्यात
आले. 
          कर्तव्यनिष्ठ,अभ्यासू,    कामात सदैव तत्पर, विवेकशील, क्षमाशील, कर्तृत्ववान, विद्यार्थीप्रिय , शिक्षकप्रिय बहुआयामी व्यक्तिमत्व
असलेले शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. अशोकराव झाडे सर यांनी शाळेची मान व संस्थेची शान
 कशी उंचावता येईल यासाठी कोणतीही काटकसर सोडली नाही. त्यांच्या कार्यकाळात शाळा उंच शिखरावर जाऊन पोहोचली. ग्रामीण भागातील शाळेसाठी आवश्यक असणारे अनेक उपक्रम साकार करण्यात पुढाकार घेतला हे विशेष.विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा असो, शिष्यवृत्ती योजना , शौचालय, वर्गखोल्या, शाळेचे ओळखपत्र, विद्यार्थी, विद्याथी दिन,विवीध शाशकीय    उपक्रम यात आपली कल्पकता   दाखवून कामाची छाप पाडली आहे. 
  शिस्त हा त्यांचा स्थायीभाव सर्वानी
अनुभवला आहे. शिक्षक म्हणूनही
त्यांचे शैक्षणिक कार्य वाखाणण्याजोगे ठरले आहे. विद्यालयाच्या वतीने प्राचार्य अशोकराव झाडे  यांचा सत्कार सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.
         याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षिका सौ. भांडारकर, प़ा. किसन वासाडे,निलेश माथणकर, श्री. गुंडोजवार, राजू
बोडे, श्री. सलाम, श्री.पुपपलवार, कु. गोंगल, यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!