गडचिरोली, चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नादेवारावजी किरसान यांना निवेदनाच्या माध्यमातून चिमुर येथील समस्या दूर करण्याची केली मागणी

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराजी किरसान यांचा चिमूर तालुक्यातील खडसंगी क्षेत्रात पुराच्या पाण्यामुळे झालेल्या शेत पिकाचे नुकसानी ची पाहणी करण्याकरिता दौरा दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन चर्चा करून चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या विकास कामा करीता निवेदन देऊन मागणी केली. यातील विषय (१) मुस्लिम समाजातील कब्रस्थान दफनभूमी येथे सौंदीकरण करण्यात यावे, (२) कवडशी केसलापूर येथील जनतेला ये - जा करण्याकरिता उमा नदीवर ब्रीज कम बंधारा बांधण्यात यावे, (३) कोर्ट रोड माणिक नगर कडे जाणाऱ्या मार्गावर ब्रिज कम बंधारा बांधण्यात यावे, (४) चिमुर येथे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता मोठे कंपनी उद्योग उभारण्यात यावे, (५) नगर परिषद क्षेत्रातील इंदिरा नगर येथील अतिक्रम धारकांना कायमस्वरूपी पट्टे उपलब्ध करून देण्यात यावे आणि विकास कामा करीता निधी उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन खासदारांना देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉ. विजय पाटील गावंडे , जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा जिल्हा परिषद चे माजी. सदस्य गजाननभाऊ बुटके, जिल्हा काँग्रेस महासचिव सचिन गाडीवार, तालुका काँग्रेस अल्पांख्याक अध्यक्ष आरीफभाई शेख, मिडिया प्रमुख पप्पुभाऊ शेख,इरफान पठाण, बबलु भाई, राजु चौधरी,आकाश श्रीरामे सचिन तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र चट्टे, श्रीकांत गेडाम आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!