ग्रामगीता महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक. 8 सप्टेंबर 2025 ला सेमाना विद्या व वन विकास प्रशिक्षण मंडळ,गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे शिक्षक दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलन व माल्ल्यार्पण करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य, डॉ. सुनंदा आस्वले व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप सातव, डॉ. हुमेश्वर आनंदे, डॉ. निलेश ठवकर, प्रा. मेहमूद पठाण, प्रा. सुशीला गजभिये तसेच कार्यक्रमाचे आयोजक  डॉ. सुमेध वावरे व प्रा. प्रज्ञा खोब्रागडे हे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून, डॉ. सुनंदा अस्वले, प्राचार्य यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून शिक्षकांची समाज घडणीतल्या भूमिकेवर प्रकाश टाकला व प्रत्येक विद्यार्थ्याकडून, कर्मचाऱ्यांकडून आपल्याला काही ना काही चांगल्या गोष्टी दैनंदिन जीवनात शिकायला मिळतात असे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. संदीप सातव यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे चांगले गुण घेऊन समाजात आपली भूमिका किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले. डॉ. हुमेश्वर आनंदे यांनी गुरु-शिष्य परंपरा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे, संस्कारांची पायाभरणी करणारे आणि व्यवहारात मूल्यांची शिकवण देणारे,शिक्षकांचा नेहमी आपण आदर, सन्मान व माणुसकी दाखवावी असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले. तसेच प्रा. डॉ. निलेश ठवकर,प्रा. मेहमूद पठाण, प्रा. सुशीला गजभिये यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानिमित्त एम.एच.सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनी कु.रोहिणी सुधाकर पाटील (विषय- रसायनशास्त्र) व कु. आलिशा ज. सोरदे, (विषय -वनस्पतीशास्त्र) तसेच बी.ए.टॉपर, संकेत संजय रामटेके,बी.कॉम.टॉपर, सार्थक संदीप डेंगे व बी.एससी टॉपर, कु. प्रांजली कैलास कामडी यांचा प्राचार्या तर्फे सत्कार करण्यात आला. व त्याचप्रमाणे बी. ए, बी. कॉम,बी.एससी सर्व प्रथम,द्वितीय व तृतीय विषयवार प्राविण्य मिळवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य व शिक्षकांतर्फे रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्रद्धा डोईजाड  व प्रा. प्रगती लेकुरवाडे, प्रास्ताविक व कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सुमेध वावरे व आभार प्रदर्शन प्रा. प्रज्ञा खोब्रागडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!