सनातन संस्था न्यासातर्फे बालसंस्कार शिबीर संपन्न.
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *सनातन संस्था या न्यासातर्फे शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा ,तुकूम चंद्रपूर*, येथे बालसंस्कार शिबीर घेण्यात आले.
सनातन संस्था या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
भावी पिढी संस्कारक्षम व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
*न्यासाच्या वतीने सौ.नंदा बिहाडे यांनी मार्गदर्शन केले* .या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.मत्ते मॅडम आणि इतर शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
या उपक्रमाचा लाभ *८०* विद्यार्थ्यांनी घेतला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!