कवितेच्या घरातर्फे बापुराव पेटकर काव्यसंग्रह पुरस्कार वितरण सोहळा, पुस्तक प्रकाशन समारंभ...
कवितेच्या घरातर्फे बापुराव पेटकर काव्यसंग्रह पुरस्कार वितरण सोहळा, पुस्तक प्रकाशन समारंभ...
वरोरा....जगदीश पेंदाम
कवितेचे घर,शेगांव बु द्वारा वर्ष २०२४-२०२५ या कालावधीत कविता,गझल, बालकविता अशा तीन विभागासाठी बापुराव पेटकर पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या पुरस्कारासाठी महाराष्ट्र, इतर बाहेरील राज्यातून १५८ च्यावर संग्रह प्राप्त झालीत.
प्रत्येक विभागासाठी रु. ५०००/-असे पुरस्कार जाहीर करण्यात आली होते.
सर्व पुस्तकांचे राज्यातील नामांकित कवी,समीक्षक,प्राध्यापक मंडळींनी परीक्षण करून
प्रभू राजगडकर,गजानन वाघमारे, प्रसेनजीत गायकवाड या कवीचे काव्यसंग्रह उत्कृष्ट ठरलीत. तसेच किरण भावसार, नंदकिशोर दामोदरे, मोहन काळे यांचे संग्रह विशेष उल्लेखनीय ठरलीत.घामाचे संदर्भ,किनारे सरकत आहे, एकदा आपणच व्हावे मोर अशा विशेष उल्लेखनीय संग्रहाचा सन्मान केला जाईल.
कवितेचे घर शेगांव बु येथे तारीख ४ ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी डॉ.विनोद आसुदानी हे उपस्थित राहणार आहेत.तसेच प्रसिद्ध कवयित्री,लेखिका,अभिनेत्री मेघना साने या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. गावातील उद्योजक प्रकाशजी पद्मावार हे हजर राहतील.
याच कार्यक्रमात मुंबई येथील कवी प्रा.भीमराव पेटकर यांच्या ' आयुष्याच्या वळणावर' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चित्रकला पुरस्कार नारायण वरभे ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार आहे त्याच बरोबर स्थळ चित्रपटाचे समीक्षा पुरस्कार कवितेच्या घरा तर्फे देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सविता बगडे या करणार आहेत.
अशी माहिती कवितेच्या घराचे कार्यवाह डॉ.प्रमोद नारायणे यांनी दिली....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!