जांभुळघाट - नेरी जाणाऱ्या रोडच्या बाजुला वाघाने केली गोऱ्याची शिकार

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा हेटी येथील राजु नागोसे यांनी दिनांक.१३/०८/२०२५ ला आपले जनावरे चरायला नेले असता जांभुळघाट-नेरी रोडच्या बाजुला दुपार च्या वेळेस जनावरे चारीत असता दबा धरून बसलेल्या ३ पट्टेदार वाघाने अचान हमला करून गोऱ्याची शिकार केली. या घटनेने इतर जनावरे व गुराखी आपला जीव वाचवत गावाकडे परत गेले. याची माहीती वनविभागाला दिली असता नंरत लगेच नेरीचे वनपाल तसेच बोदडा चे वनरक्षक यांनी घटना स्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला व घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले होते.या परीसरात पाच ते साहा पट्टेदार वाघ असल्याची जनते मध्ये चर्चा आहे.या घटनेने परीसरातील शेतकरी,गुराखी आणि नागरीकांमध्ये मोठया प्रमाणात भितीचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!