बल्लारपूरमध्ये अवैध देशी दारूचा साठा उघडकीस – टपरीवरून पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक

बल्लारपूरमध्ये अवैध देशी दारूचा साठा उघडकीस – टपरीवरून पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक

     वसंत मुन बल्लारपूर प्रतिनिधी 
₹2,870 किमतीच्या देशी दारूच्या 82 बाटल्या जप्त, एक आरोपी अटकेत
बल्लारपूर | दिनांक: 23 जुलै 2025
बल्लारपूर पोलीसांनी स्वागत गेट जवळील एका चहा टपरीवर छापा टाकून अवैध देशी दारू विक्री प्रकरणाचा पर्दाफाश केला. या कारवाईत विजय वामन उपरे (वय 36, रा. साईबाबा वॉर्ड, गुरुद्वारा जवळ) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याजवळून 2,870 रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे.

चहा टपरीच्या ओट्यावर लपवून ठेवलेली एक पिशवी तपासली असता, त्यामध्ये रॉकेट संतरा ब्रँडच्या 900 एमएलच्या 82 सीलबंद प्लास्टिक बाटल्या सापडल्या. प्रत्येकी किंमत ₹35 प्रमाणे एकूण किंमत ₹2,870 एवढी होते. आरोपीकडे कोणताही वैध परवाना नव्हता.

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65(E) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून BNS धारा 35(3)(B) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आले. जप्त केलेला संपूर्ण माल पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सदर कारवाई बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. गजानन डोईफोडे, गजानन झाडे, राजू बगमारे, अजय खरकाटे, पोअं संदेश देवगडे, प्रणय वानखेडे व राहुल धुडसे यांच्या पथकाने केली.

बल्लारपूर पोलीस नागरिकांना आवाहन करतात की, त्यांच्या परिसरात अशा प्रकारच्या अवैध दारू विक्री किंवा साठ्याची माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना कळवावी. अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!