नागरिकांचा विश्वास, आमदार मुनगंटीवार यांचं आश्वासन!

नागरिकांचा विश्वास, आमदार मुनगंटीवार यांचं आश्वासन!
वनजमिनीवरील घर हटवण्याच्या अफवांवर पूर्णविराम – "नागरिकांच्या हिताचे रक्षण, हीच माझी जबाबदारी - आमदार सुधीर मुनगंटीवार"


चंद्रपूर | दि. ६ जुलै:
बल्लारपूर शहरातील रवींद्रनगर, मौलाना आझाद, पं. दीनदयाल उपाध्याय आणि डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्डांतील नागरिकांच्या मनात सुप्रीम कोर्टाच्या नावाखाली घर हटवण्याच्या अफवांमुळे भीतीचे सावट पसरले होते. परंतु, नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर करत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ठाम शब्दांत दिलेली ग्वाही म्हणजे या अस्थिरतेवरचा विश्वासाचा आधार ठरला – "नागरिकांच्या हिताचे रक्षण, ही माझी जबाबदारी आहे."

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात घेतलेल्या विशेष बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी उपस्थित हजारो नागरिकांना विश्वास दिला की, “कोणताही निर्णय नागरिकांना बेघर करणारा होणार नाही. हे सरकार जनतेच्या हितासाठी काम करणारे आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. मी तुमच्या सोबत उभा आहे, कायमच्या लढ्याला तयार आहे.”

वनजमिनीवर ३०-४० वर्षांपासून वास्तव्यास

सदर चारही वॉर्डांतील सुमारे २८६५ घरे गेल्या तीन-चार दशकांपासून वनजमिनी व नझूल जमिनीवर आहेत. येथील नागरिकांनी या जागेवर आपले संसार उभे केले असून सुमारे १०,१८० नागरिकांचे भविष्य या घरांशी जोडलेले आहे. शासनाने याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, नाले अशा सर्व सुविधा दिलेल्या आहेत.

तथ्ये व आकडेवारी स्पष्ट!

  • २५८५ घरे वनजमिनीवर

  • २७८ मालमत्ता नझूलच्या जमिनीवर

  • एकूण क्षेत्रफळ: १५० एकर (५९ हेक्टर) नझूल जागांवर पट्टे देणे सोपे

वनजमिनीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू

 कोणीही तुम्हाला हटवू शकत नाही!

“या जमिनीवर राहणाऱ्यांना कुणीही हटवू शकत नाही, हा माझा शब्द आहे. दिल्लीपासून मंत्रालयापर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन,” असे आमदार मुनगंटीवार यांनी जाहीरपणे स्पष्ट केले.

प्रत्येक घराचा फॉर्म, प्रत्येक कुटुंबाची माहिती

प्रत्येक अतिक्रमणधारक कुटुंबाचा सविस्तर फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आली असून, हा विषय दिल्लीतील पातळीवर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमोर मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपस्थित मान्यवर आणि जनतेचा विश्वा

या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, शहराध्यक्ष रणंजय सिंग, तहसीलदार रेणुका कोकाटे यांची उपस्थिती होती. नागरिकांनी आमदार मुनगंटीवार यांच्या या भूमिकेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

 "ही फक्त आश्वासनाची नाही, कृतीची भाषा आहे. माझ्या बल्लारपूरच्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. कारण, नागरिकांचा विश्वास, हीच माझी खरी ताकद आहे!" आ. सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!