एक पेड मां के नाम..

एक पेड मां के नाम..


वरोरा.... जगदीश पेंदाम

एक पेड मां के नाम" या संकल्पनेतुन वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत  वनचेतना केन्द्र टेमुर्डा परिसरात आमदार करणभाऊ देवतळे,यांचे हस्ते त्यांच्या आईच्या नावाचे फलक रोवून वृक्षारोपण करण्यात आले.. 

सद्यस्थितीत लागवडीस उपयुक्त औषधी प्रजातीपैकी कदम, बेहडा, हिरडा, बेल व फळझाडे मौसंबी, संत्रा, बदाम, डाळिंब, पेरू, फणस, जांभुळ इत्यादी लागवड केली. परिक्षेत्रातील वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.  कार्यक्रमास उपस्थित सरपंच, पोलिस पाटील, अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्थापन समिती व टेमुर्डा येथिल प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग यांनी आपल्या आईच्या नावाने प्रत्येकी एक वृक्ष लागवड करण्यात आले. त्यासमोर प्रत्येकाच्या आईच्या नावाचे फलक रोवण्यात आले.
सतिश शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी  चांभारे क्षेत्र सहायक टेमुर्डा, लोणकर, क्षेत्र सहायक शेगाव,   ढुमने वनपाल, तिखट व.र. , करकाडे  वेदांती व.र. उपस्थित वनकर्मचारी, वनमजूर तसेच PRT सदस्यांनी सहकार्य केले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!