अतिवृष्टीने भंडारा जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा तर्फे जनतेला सतर्कतेचा ईशारा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
भंडारा / पवनी : - दिनांक.०९/०७/२०२५ भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीने सर्वत्र वेढा घातला असून मध्यप्रदेश पासून या नदीला पाणी येत असतो व नदीतील पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील गोसे या गावालागत वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर ३३ दरांचा बांध देखील बंदण्यात आला आहे. परंतु अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण होतच असते. अशातच भंडारा ते कारधा (लहान पुल),खमारी ते माटोरा, दाभा ते कोथुर्णा, शहापूर ते मारेगाव व पवनी तालुक्यातील सोनेगाव ते विरली, अड्याळ ते विरली, पिंपळगाव ते सोमनाळा,मेंढेगाव ते साते पाट,बेटाळा ते पवनी,सोनेगाव ते विरली,भेंडाळा ते मोखारा,कोंढा ते बेलाटी, तर तुमसर तालुक्यातील गोंदेखारी ते टेमनी,चुल्हाड ते सुकळी नकुल, कर्कापूर ते रेंगेपार, कर्कापूर ते पांजरा,तामसवाडी ते सीतेपार, सिलेगाव ते वाहनी,सुकळी ते रोहा,तामसवाडी ते येरली, उमरवाडी ते सीतेपार,येरली ते पीपरा, उमरवाडा ते तामसवाडी, तुमसर ते येरली, परसवाडा ते सिलेगाव,बपेरा ते बालाघाट (पुल),गोंदेखारी ते चांदपूर तसेच मोहाडी तालुक्यातील उसर्रा ते टाकला, डोंगरगाव ते कान्हळगाव ( सी.), ताडगाव ते सिहरी,पिंपळगांव ते कान्हळगांव, अकोला ते वडेगाव,आंधळगांव ते आंधळगांव पेठ, भिकारखेडा ते विहीरगांव, दहेगाव ते रोहना, टांगा ते विहीरगांव, आणि साकोली तालुक्यातील विर्शी ते उकारा,वांगी ते खोबा लाखनी तालुक्यात पूर परिस्थिती नसून लाखांदूर तालुक्यात किन्ही ते मांढळ,धर्मापुरी ते बारव्हा,मानेगांव ते बोरगांव,बारव्हा ते बोथली, कान्हळगांव ते भुयार याठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा तर्फे जनतेला सतर्कतेचा संदेश देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!