मोकाट गाढवांमुळे माजी नगर सेवक विनोद ढाकूणकर थोडक्यात बचावले

चिमूर नगर परिषदेचे मोकाट गाढवांकडे दुर्लक्ष 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगर परिषदेचे नियोजन शून्य कारभार असल्याने मोकाट जनावरे तसेच मोकाट गाढवांमुळे अनेक अपघात शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर घडले यात कुणाला जीव गमवावा लागला तर मोकाट जनावरे सुद्धा अपघातग्रस्त झालीत परंतु याकडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. यामुळे आज दिनांक.१८/०७/२०२५ शुक्रवार ला सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान मोकाट गाढवांमुळे चिमूर नगर परिषदेचे माजी नगर सेवक विनोद ढाकूणकर व त्यांची मुलगी दुचाकी बुलेट ने मार्केट मध्ये जात असतांना थोडक्यात बचावले असल्याने अशाप्रकारे न कळत घडणाऱ्या अपघातास जनतेला समोरे जावे लागू नये याकरिता या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे. तर शहरातील नाले व नाली सफाई तसेच डासांची फवारणी झाली नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून डेंगू, मलेरिया, टायफाईड यांसारख्या गंभीर आजरांचा सामोरे जावे लागत आहे.या सर्व समस्या तात्काळ सोडविल्या नाही तर आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी माजी नगरसेवक विनोद ढाकूणकर यांनी दिला आहे.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!