चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर क्रांती च्या नावावर अवैध प्रवासी वाहतूक सुरु
चक्क विद्यमान आमदारांचे फोटो लावून करतात नियमांचे उल्लंघण
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या गावास भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर चिमूर क्रांती भूमिला स्वातंत्र्य मिळाले व स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत चिमूर शहराला चिमूर क्रांती या नावानेच ओळखले जाते. आणि चिमूर ते वरोरा अवैध प्रवासी वाहतुकीकरिता ठळक मोठ्या अक्षरामध्ये चिमूर क्रांती लिहिलेली दैनंदिन एकूण १२ वाहने चालत असतात. तसेच चक्क एका वाहणावर नवीनच शक्ल वापरून विद्यमान आमदारांचे फोटो लावून अवैध प्रवासी करिता वाहन चालविले जात आहे. याची चर्चाही चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रंगलेली असतांना देखील प्रादेशिक परिवहन चंद्रपूर तसेच वाहतूक पोलीस यांचे याकडे नियमित दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.या प्रकारास कितपत चालना दयावी हे लोकप्रतिनिधी यांना कळायला हवे अन्यथा अशाप्रकारे विविध वाहने नियमाचे उल्लंघन करून दादागिरीवर उतरतील यात तिळमात्र शंका राहणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!