जन्मदात्या वडिलांची मुलाने केली कुऱ्हाडीने वार करून हत्या
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बु विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे आज दिनांक.१९/०७/२०२५ ला सकाळी मुलाने आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने सपा सप वार करत ठार केले.ही घटना वेळ ११:०० वाजता घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाब पत्रुजी दातारकर (वय५८) वर्षे असे मृत वडिलांचे नाव आहे.अभय गुलाब दातारकर(वय३४)वर्ष असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.प्राप्त माहितीनुसार वडील घरी बसून असताना आरोपी मुलाने आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने सपा सप वार करून जागीच ठार केले.या बाबतची माहिती स्थानिकांना मिळताच घटनेची माहिती शेगाव बू पोलिसांना देण्यात आली.घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असुन.घटनेचा पुढील तपास शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिह यादव तसेच PSI सुमित कांबळे, ASI दिनकर घोटेकर मदन येरणे,निखिल कौरासे, छगन जांभुळे,दिनेश ताटेवार, पोलिस शिपाई संतोष निषाद, प्रशांत गिरडकर,प्रगती भगत हे करीत आहेत.तसेच घटनेची माहिती गावात पसरतात नागरिकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!