शासकीय आश्रम शाळा कोसंबी गवळी येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा सहाय्यक प्रकल्प अधिकारी मा. श्री नरेंद्र कावळे यांच्या हस्ते उद्घाटन

शासकीय आश्रम शाळा कोसंबी गवळी येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा
 सहाय्यक प्रकल्प अधिकारी  मा. श्री नरेंद्र कावळे यांच्या हस्ते उद्घाटन 

      विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आनंददायी होऊन शाळेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोसंबी गवळी ता. नागभीड जि. चंद्रपूर येथे दिनांक 27 जून 2025 रोज शुक्रवारला प्रवेशोत्सव व पालक मेळावा चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री नरेंद्र कावळे ( सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण) यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री भैय्याजी दडमल (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती)  हे होते. मा. श्री दयारामजी कन्नाके (आदिवासी समाज सेवक) माजी जिल्हा परिषद  सदस्य मा श्री संजय गजपुरे, सरपंच मा श्री दिलीपजी रंदये  कोसंबी गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.सदर कार्यक्रमाकरिता परिसरातील मान्यवर व बहुसंख्य पालक व विद्यार्थी हजर होते. 

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री पी एस भांडारकर यांनी करून शाळा गुणवत्ता विकासासाठी नियमित प्रयत्नशील असते त्याकरीता शाळेत नियमित उपक्रम राबविल्या जाते.  पालकांनी विद्यार्थी उपस्थिती करिता सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.  दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या कुमारी संजीवनी चौधरी, द्वितीय लक्ष्मी भैय्याजी दडमल, तृतीय शितल संभाजी दडमल विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कू कांचन गायकवाड हिचा बायटर माईंड उपक्रमासाठी सत्कार करण्यात आला तसेच एकलव्य शाळेकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सिकलसेल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. ऍस्ट्रॉनॉमी सायन्स लॅब चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
       
            कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री दयारामजी कन्नाके (आदिवासी समाज सेवक)यांनी पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणाने माणूस कसा घडवावा याचे ज्ञान शाळेत मिळते तसेच आदिवासी संस्कृती जोपासून ठेवावी .शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे बुद्धीचा विकास होतो याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता विकासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री संजय गजपुरे यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर नियमित अभ्यास करावा. असे आवाहन केले. मा श्री हंबर्डे आरोग्य सहाय्यक यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे तसेच शाळा शाळा कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्या बाबत दक्ष असावे असे सांगितले.
         कार्यक्रमाचे उद्घाटक मा श्री नरेंद्र कावळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण यांनी स्पर्धा परीक्षा चा नियमित सराव घेण्यात येईल. दहावीची गुणवत्ता वाढवण्याकडे आम्ही प्रयत्नशील आहोत. शाळेची भौतिक सुविधा पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी  11 वी व 12 वी वर्ग सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येईल. असे आश्वासन दिले. आरोग्य विभागातर्फे सिकलसेल टेस्ट, मलेरिया RDK टेस्ट करण्यात आली.

            कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे श्री हंबर्डे (आरोग्य सहाय्यक बाळापुर) मा श्री धनराजजी ढोक संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,सौ आशाताई दडमल(पोलीस पाटील कोसंबी) श्री दलांचे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कोसंबी, गुरुदेव नागपुरे श्री अजय शेटे ,श्री सुरेश भुराम, सौ अर्चनाताई द डमल, सौ सीमाताई वासनिक इत्यादी प्रमुख पाहुणे हजर होते. कार्यक्रमाचे संचालन कुमारी श्रीराम मॅडम व आभार प्रदर्शन श्री डोंगरे सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!