स्वाब फाउंडेशन व शाळा समितीच्या वतीने वृक्षारोपण
स्वाब फाउंडेशन व शाळा समितीच्या वतीने वृक्षारोपण
तळोधी (बा.):
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढोणा येथे मोकळ्या पटांगणामध्ये जिल्हा परिषद शाळा समिती व स्वाब फाउंडेशन,व शिक्षकांच्या वतीने आज वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी स्वाब संस्थेच्या वतीने पुरवलेले विविध प्रकारच्या वृक्षांचे शाळेच्या पटांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण समितीचे सदस्य तथा स्वाब संस्थेच्या सदस्यांद्वारे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी
स्वाब संस्थेचे शिक्षण विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, सदस्य गणेश गुरनुले, शुभम निकेशर, आदित्य नान्हे, इत्यादी सदस्य तथा शिक्षण समितीचे पदाधिका पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!