बालाजी विद्यानिकेतन पब्लिक स्कूलमध्ये पंचपदी अधिगम पद्धतीवर विशेष कार्यशाळा संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.२८/०६/२०२५ पवनी येथील बालाजी विद्यानिकेतन पब्लिक स्कूलमध्ये भारतीय पंचपदी अधिगम पद्धतीवर एक महत्त्वपूर्ण अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला. शाळेचे प्रधानाचार्य विवेक जुमळे यांनी या कार्यशाळेत सर्व शिक्षकांना पंचपदी पद्धतीबद्दल सखोल मार्गदर्शन केले.यावेळी प्रधानाचार्य जुमळे यांनी पंचपदी मधील पाच महत्त्वपूर्ण चरणांची विस्तृत माहिती दिली. यात अधिती (शिकणे), बोध (समजून घेणे), अभ्यास (सराव), प्रयोग (अंमलबजावणी) आणि प्रसार (ज्ञान वाटणे) यांचा समावेश होता. त्यांनी प्रत्येक टप्प्याचे महत्त्व विशद केले. आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही पद्धत कशी वापरावी, याबद्दल उपयुक्त सूचना दिल्या.या अभ्यास वर्गामुळे शिक्षकांना भारतीय शिक्षण पद्धतीतील एक महत्त्वाचे आणि प्रभावी अध्यापन तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अधिक सकारात्मक बदल घडून येतील,अशी अपेक्षा आहे. या कार्यशाळेला शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!