राजर्षी शाहू महाराजांची १५१ वी जयंती सावित्रीबाई फुले कन्या शाळेत उत्साहात साजरी

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - राजर्षी शाहू महाराजांची १५१ वी जयंती सावित्रीबाई फुले कन्या शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शाहू महाराजांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन करत मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर फड यांनी केले. तर, संदिप मुंडले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यात ललिता डेकाटे, नीता मोटघरे, प्रतिभा रामटेके, भारती बोरकर यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची आणि कार्याची अधिक माहिती मिळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!