चिंधिचक आश्रमशाळेत शाळा प्रवेशोत्सव साजरा;
तळोधी (बा.) प्रतिनिधी:-
शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळा चिंधी चक येथे (ता.२७ जून) ला "प्रवेशोत्सव तथा पालक मेळावा" उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आकुलवार, उद्घाटक जगदीश सडमाके तर विशेष अतिथी सहायक प्रकल्प अधिकारी कमूताई मेश्राम, गृहपाल देऊळकर होत्या. तर प्रमुख पाहुणे शाळा समितीचे अध्यक्ष प्रवीण मसराम, सरपंच हरीजी वरठे, सरपंच छगन जी कोलते, उपसरपंच प्रदीप समर्थ, पोलिस पाटील प्रदीप धारणे उपस्थित होते.
सर्वप्रथम नवागत विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. व मिरवणूक काढण्यात आली. शाळेतील दाहावी मधे प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनी व पालकांचे शाल श्रीफळ भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. तसेच शैक्षणिक साहित्य दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य सेवा कॅम्प मध्ये विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तकांचे संच देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खोब्रागडे, संचालन धारणे, तथा आभार प्रदर्शन डिब्बे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनिल दोडके, देवीकर, मसराम, बोरकर,शहारे, वाढई, राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी तथा पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!