काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या लेकीचा भाजपात प्रवेश



काँग्रेसच्या मंत्र्याच्या लेकीचा भाजपात प्रवेश
काँग्रेसचे चंद्रपूर जिल्ह्यातील दिवंगत नेते माजी राज्यमंत्री वामनराव गड्डमवार यांची कन्या नंदा अल्लूरवर यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. त्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका आहे आणि यंदाही ते आपले भाग्य आजमावत आहे.
नंदा अल्लूरवार यांच्यासोबतच वामनराव गड्डमवार यांचे जावई पेंढरीचे माजी सरपंच वसंतराव अल्लूरवार यांनीही भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.
नंदा अल्लूरवर सावली तालुक्यातील रहिवाशी असून, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजपा प्रवेश महत्त्वाचा मानला जातो.
नंदा अल्लूरवार यांचे भाजप प्रवेशाच्या वेळी आमदार बंटी भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर शहर भाजपाचे अध्यक्ष सुभाष कासनगोटूवार यांचे सह अनेक भाजपाचे नेते उपस्थित होते.

 काँग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा श्रीमती नंदाताई अल्लुरवार यांनी आमदार श्री. किर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री स्व. वामनराव गड्डमवार यांची कन्या असलेल्या नंदाताईंनी पक्षप्रवेशानंतर सांगितले –
"पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या महिलांप्रती सकारात्मक कार्यपद्धतीमुळे मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे."  त्यांच्या येण्याने पक्ष संघटनेला बळकटी मिळेल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!