अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण जखमी
आज सकाळी ९:१५ चे दरम्यान मूल गडचिरोली रोडवर आकापुर गावाच्या एक की.मी.समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक मादी चौसींगा हरीण जखमी झाले.. माहिती मिळताच वनरक्षक एस.डब्लु.बोनलवार, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, दिनेश खेवले, मनोज रणदिवे हे घटनास्थळी उपस्थित झाले व माजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संदिप छौनकर यांनी जखमी मादि चौसींगा हरीण वर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर जखमी चौसींग्याला सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले व सावली चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विनोद धुर्वे यांचे सूचने नूसार पूढील उपचारासाठी चंद्रपूर प्राणी उपचार केंद्रात पाठविण्यात आले....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!