वरोरा, शेगाव, कोकेवाडा बस सुरू करा.. शालेय विद्यार्थ्यांची प्रशाक्षणाला मागणी....
वरोरा, शेगाव, कोकेवाडा बस सुरू करा..
शालेय विद्यार्थ्यांची प्रशाक्षणाला मागणी....
वरोरा.... जगदीश पेंदाम
तालुक्यातील शेवटच्या टोकाला येत असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प गावातील अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, येथील विद्यार्थ्यांची बस उन्हाळ्यातमध्ये बंद करण्यात आली होती.. सोमवारपासून शाळा सुरू झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शेगाव,तसेच वरोरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागत असून प्रशासनाने लवकरात लवकर बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे.
एकीकडे पावसाचे दिवसाला सुरुवात झाली शिक्षण घेत असताना पावसामध्ये गावाकडे येण्याकरता उशीर होत असते विद्यार्थ्यांना साधन नसल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी जात असुन बस बंद असल्याने शेगाव,चारगाव,अर्जुनी,कोकेवाडा गावातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसअभावी त्रास सहन करावा लागत असून आजही जंगलागत असलेल्या ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांना जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे रात्रीच्या सुमारास येताना आपला जीव मुठीत धरून यावे लागते वन्य प्राण्यांपासून अनुचित घटना होण्याची संभावना निर्माण झालेली आहे, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर बस सुरू करण्याची मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!