नागीन सह सापाच्या चौदा अंडे व चौदा पिल्ल्यांना जीवनदान...
पावसाचे दिवसाला सुरुवात झाली असुन साप निघायचे प्रमाण सुरू झालेल आहे, शेगाव पासून जवळच असलेल्या सोनेगाव या गावी एका घरामध्ये एक नागीण तसेच १४ पिल्ले व चौदा अंडे पकडण्यात सर्पमित्रांला यश आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथून जवळच असलेल्या सोनेगाव (वडधा) येथे साप असल्याची माहिती सर्पमित्र राकेश भुतकर यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली असता. सर्पमित्र राकेश भूतकर यांनी त्या ठिकाणी जाऊन सायंकाळी ७:३० वाजता जाऊन ११ पिल्ले आणि १४ अंडे रात्री १० वाजता पकडुन आणण्यात आले.पुन्हा काही तासानंतर मोठा साप असल्याची माहिती दिली. सर्पमित्रांने कसलाही विलंब न करता नथ्थुजी माहुले यांच्या घरी जाऊन नागिण व ३ पिल्ले रात्रीचे २ वाजता पकडुन आणण्यात आले.दुसऱ्या सकाळी शेगाव वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थितीत कक्ष क्रमांक.९२७ सालोरी या झुडपी जंगलात १ नागीन, १४ पिल्ल्याना सुखरूप पणे निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आली तसेच ऊबदार जागेवर पाला पाचोळा टाकून १४ अंडी सुरक्षित ठिकाणी ठेवून जीवनदान देण्यात आले.यावेळी उपस्थित शेगाव वनपरिक्षेत्र अधिकार लोणकर, पर्यावरण प्रेमी जगदीश पेंदाम, वनमजूर आदी नागरिक उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!