महिला प्रसाधन गृहामध्ये दुर्मिळ फोस्टेन मांजऱ्या सापाला मिळाला जिवनदान

सर्पमित्रांनी सापास पकडून दिले जंगलात सोडून

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - साप दिसला की माणसाच्या मनामध्ये सर्वात अगोदर भीती निर्माण होते, अशातच एक साप ताडोबातील पर्यटक हातोडा गेट येथे महिला प्रसाधन गृहात महिला पर्यटकांना आढळला असून त्याला सर्पमित्रांनी सुरक्षित पकडून वन विभागाच्या माध्यमातून निसर्ग अधिवासात सोडण्यात आले.ताडोबातील व्याघ्र प्रकल्प जगात नावाजलेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाघाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटन नेहमी येत असतात अशाच पर्यटक म्हणून खातोडा गेटवर पर्यटक थांबले असता महिला प्रसाधनगृहामध्ये फोस्टेन मांजऱ्या नीम विषारी हा साप आढळून आला याची माहिती वनविभाग कर्मचाऱ्यात देण्यात आली वनविभाग कर्मचारी क्षेत्र सहाय्यक नन्नावरे यांनी सर्पमित्र जगदीश पेंदाम  यांना फोनद्वारे साप असल्याची सांगितले  असता खातोडा गेट या ठिकाणी जाऊन त्याला सुरक्षित पकडण्यात आले.फोस्टेन मांजरे हा साप निम विषारी असून हा दोन प्रकारे मिळत असतो हा साप सहा ते सात फूट पर्यंत मिळत असतो, याच्या रंग तपकीरी,तसेच राखडी रंगाच्या आडवे पट्टे, तसेच चौकोनी नक्षी पट्टे असणारे, डोक्यावर एक गळद काळी तसेच डोक्यामागे मानेपर्यंत एक काळी रेष असते हा साप पश्चिम घाटात, पश्चिम बंगाल, ओडीसा, पूर्व-पश्चिम हिमालयात सुद्धा मिळत असतो हा साप चंद्रपूर जिल्ह्यात आढळल्याने अत्यंत दुर्मिळ सापात याची गनना आहे. या सापाला सुरक्षित पकडण्यासाठी ताडोबा वनपरिक्षेत्र अधिकारी चिवंडे,क्षेत्र सहाय्यक नन्नावरे, वनरक्षक झोनकले, वन कुटी मजूर,आदींनी यशस्वीरित्या सहकार्य केले असुन त्याला सुरक्षित ताडोबातील खातोडा निसर्ग अधिवासात सोडण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!