रेती माफिया कडून दोन दिवसात दोन मजुरास मारहाण


माजी जिल्हा परिषद सदस्यासह मुलाचीही चंदनखेड्यात दबंग गिरी

पोलिसांनी कठोर कारवाई करावी पत्रकार परिषदेत मागणी

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
 
भद्रावती : - अवैध रेतीबाबत माहिती दिली यावरून मजुरास मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेतीच्या गाडीवर कामावर का नाही आलास म्हणून दुसऱ्या मजुरालाही मारहाण केल्याची घटना दिनांक.२३ जून २०२५ रोजी सोमवारला घडली या प्रकरणात दोन्ही मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशा दबंगिरी करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य व त्याच्या मुलासह अन्य आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमीच्या नातलगासह गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.अनिल गायकवाड वय ३४ वर्षे राहणार चंदनखेडा व दुसऱ्या घटनेतील निलेश संतोष गोहणे वय २५ वर्षे व त्याची आई कुसुम संतोष गोहणे वय ४० राहणार चंदनखेडा असे जखमीचे नाव आहे यातील आरोपी जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड त्याचे मुलगा रामेश्वर गायकवाड, गजू रणदिवे, विशाल गुंडीकवार, गणेश नं न्नावरे असे आरोपींची नावे आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड हा गेल्या कित्येक दिवसापासून या भागात रेती तस्करी करीत आहे या गावात या दोघा बाप लेकाची दहशत असून त्यांनी रेतीबाबत प्रशासनाला माहिती देणाऱ्या मजुराला मारहाण केली  तर दुसऱ्या घटनेत रेतीच्या ट्रॅक्टर वर कामावर का आला नाही दुसऱ्याच्या कामावर का गेलास म्हणून मजूर व त्याच्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. या घटनेची भद्रावती पोलिसात तक्रार करूनही त्या आरोपीला अजून पावेतो अटक करण्यात आली नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमी ची आई कुसुम संतोष गोहणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी चंदनखेडा सरपंच नयन जांभुळे , विकास धांडे, निकेश ढोक,शुभम जांभुळे आधी उपस्थित होते . 

रेती तस्करी करणारा मारोती गायकवाड यांनी गावातील मजुराला मारहाण केली यापूर्वीसुद्धा त्यांनी शासकीय अधिकारी तसेच इतर व्यक्तीवर हल्ले केले आहे या व्यक्तीमुळे गावातील शांतता भंग होत आहे या व्यक्तीला चंदनखेळा गावातूनच तडीपार करण्याची मागणी प्रशासनाला करणार आहोत - नयन जांभुळे सरपंच चंदनखेडा

मारहाणी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे एका प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व घटनेचा पुढील तपास सुरू आहे - योगेश्वर पारधी ठाणेदार भद्रावती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!