अषित प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतच मिळाले बस पास

राज्य परिवहन महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक.२४/०६/२०२५ विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी या हेतूने राज्य परिवहन महामंडळ, पवनीने एक अभिनंदनीय उपक्रम राबवला आहे.या उपक्रमांतर्गत,पवनी येथील अषित प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बस पास थेट शाळेतच वितरित करण्यात आले.यावेळी वाहतूक नियंत्रक कविता काटेखाये तथा शिपाई नरेंद्र देशमुख यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना बस पासचे वाटप केले.राज्य परिवहन महामंडळाने शाळेतच बस पास उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बस स्थानकावर जाऊन पास काढण्याचा त्रास वाचला आहे.परिवहन मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.यामुळे विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे अधिक सोयीचे झाले असून,हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राकेश बिसने तथा शिक्षक वृंद अशोक गिरी,प्रयागराज भोयर मुरलीधर जिवतोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!