चिमूर शहरात मोठ्या उत्साहाने धर्मवीर संभाजीराजे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

धर्मवीर संभाजी महाराज गृप चिमूर तर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती निमित्त महाप्रसादाचे वाटप 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : -  धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील पुरंदर किल्ला याठिकाणी १४ मे १६५७ ला झाला त्यांचे पूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे होते.छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.याच अनुषंगाने दिनांक.१४/०५/२०२५ रोजी आज धर्मवीर संभाजी महाराज गृप चिमूर तर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती निमित्ताने चिमूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे महाप्रसादाचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.यावेळी छत्रपती संभाजी महाराज ग्रुप चे पवन बंडे,स्नेहल शंभरकर,गिरिधर रणदिवे,नंदू सातपैसे,डॉ.प्रितेश जैस्वाल,सारंग बंडे,पवन डुकरे, प्रज्वल बोबडे,आदित्य पिसे,करन गोठे,वैभव लांडगे,राकेश बघेल,बालू हेलवटकर, निखिल डोईजड, अभिजित बेहते आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!