ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सागवानाची तस्करी करता़ंना चार आरोपी अटकेत
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव व वन्यजीव संघर्ष पेटला असतांना दुसरीकडे मात्र वाघासाठी राखीव असलेल्या कोर क्षेत्रामध्ये सागवणाची तस्करी करताना बैलबंडी सोबत ४ आरोपीला वन विभागा़नी भानुसखिंडी पि.एफ.क्षेत्रात अटक केली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणांनी जंगलात कुठेही आगीमुळे नुकसान होऊ नये यासाठी वन विभागाकडून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र गस्त सुरु असते. अशीच गस्त काल दि. १८ मे ला सुरु असताना सायंकाळी ४ वाजता च्या दरम्यान अवैध सागवान लाकूड भरलेली बैल बंडी वन मजुरांना आढळून आली असता वरिष्ठ अधिकारी यांना या बाबत ची माहिती देण्यात आली. वन अधिकारी यांनी सागवान लाकूड चोरीसाठी वापरण्यात आलेली बैल बंडी व चार आरोपी यांना ताब्यात घेऊन वन परीक्षेत्र कार्यालय ताडोबा कोर वन्यजीव वडाळा येथे ठेवण्यात आले आहे.या प्रकरणासंदर्भात माहिती घेण्यासाठी फोन द्वारे ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोर (वन्यजीव) वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे वडाळा यांच्याशी संपर्क केले असता फोनवर माहिती मिळू शकली नाही.
गावात वेगळीच चर्चा रंगली असून ताडोबा कोर झोन मध्ये कोणालाही प्रवेश नाही तरीपण कोर झोन मधून सागवान झाडाची तस्करी होत आहे यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय शक्य नसल्याचे गावकऱ्यांचे चर्चेतून लक्षात येते आहे, त्यामुळे सदर प्रकरणात सखोल चौकशी झाल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!