पवनी येथील पवनगड किल्ला लगत असलेल्या टेकडीवरील अतिक्रमण कारवाई ला स्थगिती मिळण्याकरिता विदर्भ युवा क्रांती संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी येथील पवनगड किल्ला लगत असलेल्या टेकडीवरील अतिक्रमण कारवाई ला स्थगिती मिळण्याकरिता विदर्भ युवा क्रांती संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन दिनांक.20/05/2025 ला सकाळी 11:00 वाजता करण्यात आलेले आहे. या मोर्चाची सुरुवात शिवाजी चौक ईथुन होणार आहे. तर समाप्ती तहसील कार्यालय पवनी याठिकाणी होणार असल्याने जनतेनी जास्तीत - जास्त मोठ्या संख्येनी आपली उपस्थिती दर्शवावी जेणेकरून परकोट टेकडीवर जवळपास गेल्या 35 ते 40 वर्षापासून वास्तव्यास असणारे 200 हूण अधिक परिवार राहत आहेत व परिवाराच्या मूलभूत गरजा पासून वंचित होऊ नये कुटुंबातील शिकत असलेल्या मुलांवर कोणत्याच प्रकारचा अन्याय होऊ नये आणि शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विदर्भ युवक क्रांती संघटनेतर्फे पवनी नगरीतील समस्त नागरिकांतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!