जिटी कोर एसटी कंसलटंसी नावाच्या अनधिकृत कंपनीने जनतेच्या ४० कोटींची केली फसवणूक
अनेक गुंतवणूकदारांची पोलीस स्टेशनला धाव
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - जिटी कोर एसटी कंसलटंसी नावाच्या अनधिकृत कंपनीने भांडारा, गडचिरोली,चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील लोकांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ४० कोटींची केली फसवणूक सविस्तर वृत्त तोंडी रिपोर्ट पोलीस ठाणे लाखांदूर दिनांक. 17/01/2025
नाव - मोहनलाल तुकाराम खोब्रागडे वय - 57 वर्षे व्यवसाय - कृषी केंद्र, रा -विरली (खु).ता लाखांदूर मो.नं.9823375383 मी समक्ष विचारले वरून सांगतो कि, वरिल ठिकाणी माझ्या परिवार सोबत राहत स्वतःचे मालकिचे श्री कृषी केंद्र नावाचे दुकान चालवितो. माझया परिवारात माझी पत्नी सौ. आरती व 2 मुले असून मुलगा मयूर रत्नागिरी येथे एमबीबीएस चे शिक्षण घेत असून मुलगी कु. गायत्री नागपूर येथे एमबीए चे शिक्षण शिकत आहे. मंगेश वाणी, रा - पाऊनगाव व रविंद्र बोरकर, रा - इटान हे गावाजवळिल असल्याने माझ्या ओळखिचे आहे.नोव्हेंबर 2023 मध्ये एका दिवशी मंगेश वाणी माझ्याकडे गैरअर्जदार 1) हितेश चुटे. रा - सडक अर्जनी, जि - गोंदिंया, 2) रत्नेश तिवारी, रा - वडसा, जि - गडचिरोली व 3) किशोर गोंडाने, रा -अर्जूनी मोरगाव, जिल्हा - गोंदिया यांना माझ्या दुकानात घेऊन आला, मंगेश वाणी याने मला सांगितले कि, हितेश चुटे सरांची जिटी कोर एसटी कंसलटंसी नावाची कंपनी असून त्यामध्ये रत्नेश तिवारी व किशोर गोंडाने सर पार्टनर आहे. जिटी कोर एसटी कंसलटंसी चे माध्यमातून चुटे सर शेअर मार्केट मध्ये पैशाची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवितात जीटी कोर एसटी कंसलटंसी मध्ये पैसे गुंतविल्यास कंपनीचे 'स्किम मध्ये ते 6 लाख रुपयांचे गुंतवणूकिवर प्रती महिणा 10% दराने व्याज, 6 लाख चे पुढे 10 लाख रूपयांचे गुंतवणूकिवर प्रती महिणा 12% दराने व्याज, 10 लाख चे पुढेते 14 लाख रूपयांचे गुंतवणूकिवर प्रती महिणा 14% दराने व्याज व 14 लाखाचे पुढिल गुंतवणुकीवर प्रती महिणा 16% दराने व्याजदर आम्ही गुंतवणूकदारांना देतो असे त्या सरवांनी मला सांगितले. गुंतवणूक केल्याचे 3 महिणे नंतर तुम्ही कधिही तुमचे पैसे परत कादू शकता. जेव्हा - केव्हा तुम्ही पैसे काढाल तेव्हा तुम्हाला व्याजदर मिळणे बंद होईल. मी आणखी काही व्यक्ती जोडल्या 3 टक्के दराने कमीशन सुध्दा मिळेल असे सांगितले. सदर स्कीम बद्दल मी आधी ही ऐकले होते. त्यामुळे गुंतवणूक करिता मी होकार दिला.मला जीटी कोर एसटी कंसलटंसी मध्ये गंतवणूक करायची असल्याने एलआयसी मधून,कोआपरेटीव्ह बँकेतून तसेच सेंटरल बँकेतून कर्ज घेऊन माझे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आसगाव शाखा,ता. पवनी चे पासबुक खाते क्रमांक. 3176994726 मधून 21 लाख रुपये दिनांक 04/12/2023 रोजी एक्सिस बँक देवरी, जि - गोंदिया चे CTCORE ST CONSULTANCY चे पासबुक खाते क्रमांक.923020012507120 वर आरटीजीएस करून पाठविले.मी पैश्यांची गुंतवणूक केल्यावर चौघांनी मला लाखांदूर येथे बोलावून 100/- रूपयांचे स्टँप पेपर वर नोटरी करून दिनांक 04/1212023 पासून पुिल 11 महिणे दरमहा 3,36,000/- रुपये प्रमाणे 36.96.000/- रुपयेव 11 महिणे पुर्ण झाल्यावर दिनांक 04/1112024 मी गुंतवण्क केलेले 21 लाख रुपये असे एकून 57.96.000/- रुपये देण्याचे करारनामा लिहून दिले.केलेल्या करार नुसार हितेश चुटे यांनी मला दिनांक. (1) 13/02/2024 (2)11/03/2024 (3) 11/04/2024 व (4) 12/06/2024 रोजी 3.36.000/- प्रती महिणा प्रमाणे 4 वेळा एकून 13.44,000/- रुपये माझ्या अकाऊंटवर जमा केले. त्यानंतर मला पैशे मिळाले नाही. तसेच, जुलै 2024 पासून हितेश चुटे, रलमेश तिवारी, किशोर गोंडाने व मंगेश वाणी यांनी मला महिण्याचे व्याजाचे पैसे दिले नाही. तसेच मी त्यांना माझी मुद्दल मागितली असता ते मुद्दल सुध्दा देत नाहीत दर महिण्याचे व्याजाचे पैसे मिळणे बंद झाल्यावर मला समजले कि, जीटी कोर एसटी कंसलटंसी नावाची कोणतीही कंपनी नसून आमीशाला बळी पडून सदर स्किम मध्ये माझ्या सारखेच एकून 450 नागरिकांनी जवळपास 40 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांना सुध्दा दर महिणा व्याजाचे पैशे मिळणे बंद झाले असून आम्ही त्यांचेकडे गुंतवणूक केलेली रक्कम सुध्दा मिळणे बाकी आहे.तसेच. त्यामुळे मी 'व इतर माझ्या ओळखीचे खालील पिडितांनी अर्ज तयार करून पोलीस ठाणे लाखांदूर येथे दाखल केला. त्यावेळी त्यांचेकडून मला समजले कि, रवींद्रबोरकर, रा - इटान हा सुध्दा त्यांचा साथीदार आहे. गुंतववणूकदारांची नावे व त्यांनी गुंतवणू्क केलेल्या रकमेची यादी (1) मोहनलाल तुकाराम खोब्रागडे वय 57 वर्ष राहणार विरली यांनी 14/12/2023 रोजी 21,00,000/- रुपये गुंतवणूक केली. (2) जगदिश केवळराम मिसार, वय 47 वर्ष, राहणार - किरमटी यांनी 14/06/2024 रोजी 15,00,000/- रुपये गुंतवणूक केली. (3) सौ. कांचन विलास मिसार वय -42 वर्ष. राहणार वडसा यांनी 10/02/2023 ला 12,00,000/- रुपयांची गुंतवणूक केली.(4) गोपाळ केवळराम मिसार, वय - 50 वर्ष. राहणार किरमटी यांनी 28/08/2023 ला 28,00,000/- रुपये गुंतवणूक केली.(5) नितिन श्रीकृष्ण ढोरे, वय -32 वर्ष, राहणार सरांडी (बु) यांनी 17/02/2024 ला 11,00,000/- रुपये गुंतवणूक केली. (6) शालीकराम तिमाजी पारधी, वय - 79 वर्ष, राहणार इटान यांनी 15/06/2024 ला 4,00,000 रुपयांची गुंतवणूक केली (7) विलास यादव दिघोरे, वय -55 वर्ष, राहणार चंद्रपुर यांनी 15/06/2024 ला 25,00,000/- रुपयांची गुंतवणूक केली अशी एकूण 1,16,00000/- रुपयांची गुंतवणूक झाली असून आरोपी (1) हितेश मधुकर चुटे राहणार सहकार नगर सडक अर्जुनी, तहसील सडक अर्जनी जिल्हा गोंदिया, (2)रत्नेश गरुप्रसाद तिवारी राहणार देसाईगंज वडसा, तहसील वडसा,जिल्हा गडचिरोली, (3)किशोर चरणदास गोंडाणे राहणार परसटोला,तहसील अर्जनी मोरगाव, जिल्हा गोंदिया, (4)मंगेश डाकराम वाणी राहणार पाहुणगाव तहसील लाखांदुर,जिल्हा भंडारा,(5)रविद्र प्रल्हाद बोरकर राहणार ईटान,तहसील लाखांदुर जिल्हा भंडारा यांचेवर अपराध क्रमांक.0011/2025 बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम, 2019 कलम 22 बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम, 2019 कलम 21 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरंक्षण अधिनियम, 1999 कलम 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरंक्षण अधिनियम, 1999 कलम 3 भारतीय दंड संहिता ९८६० कलम ४२० भारतीय दंड संहिता ९८६० कलम 417 भारतीय दंड संहिता ९८६० कलम 406 भारतीय दंड संहिता ९८६० कलम 120 - B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!