१९ वर्षीय मुलीवर तीन नाराधमांनी केले लैंगिक अत्याचार

चिमूर शहरातील तळोधी नाईक मार्गांवरील शेत शिवरातील घटना

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२०/०५/२०२५  ला रात्री ०१:४३ मिनिटांनी चिमूर पोलीस स्टेशन येथे १९ वर्षीय मुलीवर तीन नाराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून संपूर्ण हकीकत आजीचे घरी गोंड मोहल्ला चिमूर येथे पायी एकटीच जात असताना यातील आरोपी क्रमांक.(१) प्रतीक सुनील सटोने वय २६ वर्षे  राहणार नेताजी वार्ड चिमूर हा मोटर सायकलने तिच्या जवळ येऊन मी तुला तुझे आजीचे घरी सोडून देतो असे म्हणून पीडीतास मोटरसायकलवर बसवून त्याचे तळोधी नाईक शेत शिवारात असलेल्या शेतात झोपडीमध्ये नेऊन, आरोपीने तिचे सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यानंतर आरोपी क्रमांक.(२) विकी उर्फ विक्रांत खुशाल सटोणे वय २९ वर्षे राहणार नेताजी वार्ड चिमूर आरोपी क्रमांक. (३)अंकित संजय काकडे वय ३१ वर्षे राहणार टीचर कॉलनी चिमूर यांचेवर अप.क्र. २०५/२०२५, कलम ६४,७० (१), ३५१ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर यातील दोन आरोपी अटकेट असून एक आरोपी फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दिप्ती मरकाम व सतिश झिलपे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!