अपघातात चालक ठार तर काही इसम किरकोळ जखमी
ट्रॅव्हल्स सुद्धा घटना स्थळावरुन गायब
चालकाला कोणत्या रुग्णालयात दाखल केले याची पोलिसांना सुद्धा माहिती नाही
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - नेरी वरून जवळ असलेल्या खांबाडा येथील विवेकानद विद्यालयाच्या समोरील उभ्या झाडाला चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने धडक दिली आणि अपघात घडला यात चालक गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेत मत्यु झाला असल्याची चर्चा असून अजूनही कोणत्या रुग्णालयात त्याला दाखल केले यांची माहिती पोलिसांना सुद्धा मिळाली नाही तसेच घटनास्थळा वरून ट्रॅव्हल्स सुद्धा गायब करण्यात आली असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे सदर घटना दि 18 मेला सकाळी 10 वाजता दरम्यान घडली आहे
सविस्तर असे की गोंदेडा येथील सुरेश श्रावण डांगे यांच्या मुलीचे लग्न वर्धा येथे दि 18 मे ला सायंकाळी होते त्या लग्नाला जाण्यासाठी आणि वरात नेण्यासाठी उमरेड येथील साईराम टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स ची एम एच-04 एफ के -4686 या क्रमांकाची गाडी केली होती सदर ट्रॅव्हल्स गोंदेडा येथून वरात घेऊन निघाली असता खांबाडा जवळील विवेकानंद विद्यालयाच्या समोर चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने झाडाला धडक दिली या धडकेत चालक राजू माधवराव वर्गने वय 65 वर्षे याला गंभीर मार लागला तर काही वरातीतील लोकांना किरकोळ मार लागल्याची चर्चा आहे चालकाला बाहेर काडून रुग्णालयात नेल्याची चर्चा असून कोणत्या रुग्णालयात त्याला नेण्यात आले आणि भरती करण्यात आले याची माहिती नसून काही नागरिक सदर चालक हा नेताना वाटेत मरण पावला असे बोलीत आहेत तर सायंकाळी सदर चालक मरण पावला असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे तसेच या अपघाताची माहिती पोलीस विभागाला सुद्धा देण्यात आली नव्हती मात्र सुगावा लागताच पोलीस घटनास्थळी जाऊन आले असल्याची माहिती आहे परंतु चालक कुठे आहे कुठल्या रुग्णालयात आहे याची माहिती त्यांच्याकडे नाही तसेच घटनास्थळ वरून ट्रॅव्हल्स सुद्धा गायब करण्यात आली आहे सदर ट्रॅव्हल्स नेरी येथील वाघे यांच्या घरासमोर रस्त्यावर उभी आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!