त्या अपघात प्रकरणी पोलीस विभाग अनभिज्ञ कसे ?

गुन्हा दाखल करण्यास वेळ का ?पोलीस विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न?

खांबाडा गावाजवळील ट्रॅव्हल्स अपघात प्रकरण

नेरी - प्रतिनिधी

नेरी : - चिमूर तालुक्यातील नेरी पोलीस चौकीच्या हद्दित येत असलेल्या खांबाडा गावातील विवेकानंद शाळे जवळ गोंदेडा येथील लग्नाचे वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने जोरदार धडक बसून चालक राजू माधवराव वरघणे (५२) याचा वाटेत मृत्यू झाला असल्याची घटना दि. १८ मे ला घडली आहे.उमरेड येथील साईराम टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स एम.एच.-०४ एफ के -४६४८ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स असून, सदर घटनेला दोन दिवस झाले आहे. अपघात ग्रस्त ट्रॅव्हल्स नेरी - सिंदेवाही  रोडवरील मुख्य रस्त्यावर वाघे यांच्या घरा समोर ताडपत्री झाकून उभी आहे. डोळ्या समोर ट्रॅव्हल्स दिसत असताना देखील स्थानिक चिमूर पोलीस विभागाने या घटनेचा गुन्हा नोंद न करता ट्रॅव्हल्स मालकाला मोकळीक दिल्या जात असल्याने पोलीस विभागावर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.अपघात प्रकरणाची कसून चौकशी केल्यास मृत्यूची नोंद कुठे करण्यात आली. घटना चिमूर तालुक्यातील असताना साधी आरोग्य विभाग व पोलीस विभागात नोंद नाहीं. ट्रॅव्हल्स चे कागदपत्र तपास नाही इन्शुरन्सस आहे की नाहीं.? या दिशने तपास होणे गरजेचे आहे.तसेच सदर चालकाच्या मृत्यूचा पंचनामा सुद्धा झाला नसल्याची जोरदार चर्चा नागरिकांत सुरू आहे. अपघात घडल्यावर शवविच्छेदन होणे गरजेचे आहे मात्र, ट्रॅव्हल्स मालकाने मृतक चालकाला कुटूंबाच्या हवाली करून हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे सांगण्यात येऊन प्रेतअग्नी दिली असल्याची नागरिकांत चर्चा आहे. मात्र हा अपघात खांबाडा येथेच घडला असल्याचे ट्रॅव्हल मध्ये बसलेल्या व्हराडी मंडळींकडून स्पस्ट झाले आहे.  तसेच हृदय विकाराचा झटका आला तर कोणत्या तरी वैधकिय अधिकारी किंवा रुग्णालय, आरोग्य विभागात दाखवायला पाहिजे होते परंतु, कुठेही दाखविण्यात आले नाही. यावरून सदर ट्रॅव्हल्स मालक प्रकरण दाबत असल्याचा प्रकार दिसत असल्याचे निदर्शनास येत आहे. 
तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित अपघाताच्या संदर्भात पोलीस अधिक्षक यांनी योग्य दिशेने  तपास करावा अशी मागणी होत आहे.

_________________________

अपघात प्रकरणाची अजूनही तक्रार नाहीं कुटूंबीय किंवा नातेवाईक यांनी तक्रार दिली नाही त्यामुळे गुन्हा नोंद केला नाहीं.पोलीस विभागाने घटनास्थळाची पाहणी केली आहे.

 संतोष बाकल
पोलीस निरीक्षक, चिमूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!