अतिक्रमण कार्यवाही तात्काळ थांबविण्यात यावी याकरिता शिवसेना पवनी शहर प्रमुख देवराज बावनकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी भंडारा तसेच भंडारा - पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्रभाऊ भोंडेकर यांना दिले निवेदन
शहर - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - महाराष्ट्र शासन निर्णयान्वये संरक्षित व असंरक्षित गड - किल्ल्यावरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी भंडारा यांचे अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलेली असून पवनी शहरातील ऐतिहासिक परकोट क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांवर अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. सदर अतिक्रमण कार्यवाही तात्काळ थांबविण्यात यावी यासाठी शिवसेना,पवनी शहर तर्फे पवनी शहर प्रमुख देवराज बावनकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी भंडारा आणि भंडारा - पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्रभाऊ भोंडेकर यांना निवेदन देण्यात आले.पवनी परकोट क्षेत्रात अनेक वर्षांपासून घरे उभारलेली असून त्या घरांची नोंद भूमी अभिलेखात सन 1972 पासून आहे.परंतु नुकत्याच निघालेल्या महाराष्ट्र शासन निर्णयामुळे पवनी परकोटातील अतिक्रमणे दूर करण्याचे निर्देश असून ते अन्यायकारक आहे. पवनी परकोट क्षेत्रात अनेक वर्षांपासून स्थानिक लोकांचे वास्तव्य असून पाणी,वीज पुरवठा, मालमत्ता कर, इत्यादी सर्व सुविधा अधिकृतपणे जनतेला मिळालेल्या आहेत. पुरातत्व विभागाचे अधिनियम नुसार 2010 पूर्वी अस्तित्वात असलेल्या संरचनाना नियमित करण्याची तरतूद आहे. तरी पवनी परकोटातील घरे संरक्षण संरचनाच्या यादीतून वगळून अतिक्रमणाची कार्यवाही तात्काळ रद्द करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!