चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाच्या हल्यात २ ठार - वाघाच्या हल्यात ८ दिवसात ८ मनुष्यबळी

 


चंद्रपूर - शेळ्याकरिता चारा आणत असतांना ऋषीं शिंगाजी भोयर वय ६५ रा.  भादूर्णा ता. मुल तर दुसऱ्या घटनेत तेंदूपत्ता तोडत असतांना मारोती शेंन्डे रा. वाढोणा ता. नागभीड  यांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला. याच आठवड्यात रविवारपासून सुरु झालेल्या मालिकेत सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथील ३ महिला, भादूर्णा येथील १ महिला, महादवाडी येथील १ महिला, चिमूर तालुक्यातील १ महिला व आज २ व्यक्ती ठार झाल्याने जिल्ह्यात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!